तुटलेल्या कठड्याचे संरक्षण व्हावे व वाहने तुटलेल्या कठड्याशेजारून सुरक्षितपणे जावीत म्हणून निफाड पोलीस ठाण्याचे दोन बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. मात्र, रात्रीच्या सुमारास नाशिक बाजूकडून वेगाने येणाऱ्या वाहनांच्या वाहन चालकांना सदर बॅरिकेट्स लक्षात येत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनावधानाने या बॅरिकेट्सला वाहनांची धडक बसून मोठा अपघात होऊन वाहन नदीत पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सदर लोखंडी कठडे तातडीने बसवण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.
इन्फो
शांतीनगर त्रिफुलीवर खड्डे
येथील शांतीनगर त्रिफुली येथे एकाच ठिकाणी पुन्हा मोठे खड्डे पडल्याने खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. या त्रिफुलीवर निफाड - पिंपळगाव बसवंत रोडच्या बाजूने सदरचे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी हे खड्डे तात्पुरते बुजवले होते. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा हे खड्डे पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.