----------------------
खरीप हंगामीच कामे विस्कळित
नांदगाव : नुकत्याच येऊन गेलेल्या चक्रीवादळामुळे शेतीच्या खरीप हंगामाची पूर्व मशागतीची कामे विस्कळीत झाली असून कचरा वेचणी, कांदा कापणी, वीजपुरवठा खंडित झाल्याने तसेच इंधन विक्रीवर आलेल्या मर्यादा यामुळे मशागतीला उशीर होत आहे. वादळाने शेतातील झाडे व फळ झाडे मोडून पडली, आंबा, चिकू, डाळींब,पेरू, द्राक्षे पिकांची नासाडी झाली. तसेच हिरवा चारा जमिनीवर आडवा पडला.
----------------------
नांदगाव स्टेशन प्रवाशांविना भकास
नांदगाव : नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी असलेली एकमेव गाडी सेवाग्राम एक्स्प्रेस बंद झाल्याने नांदगाव रेल्वे स्टेशन रेल्वेचे एक स्थानक म्हणून उरले आहे अशी तक्रार युवा फाउंडेशन सामजिक संस्था यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे निमित्त पुढे करून येथील प्रवासी गाड्यांचे एका पाठोपाठ थांबे रद्द केले. त्यामुळे स्टेशन प्रवाशांविना भकास झाले आहे. प्रवाशांसाठी बांधण्यात येणाऱ्या नवीन पादचारी पुलाचे काम रखडले गेले. २०१४ च्या केंद्रातील सत्ता बदलानंतर नांदगाव स्थानकाचा कायापालट होणार अशी आशा कोरोना काळात निराशेत बदलली. कोविड काळात रेग्युलर प्रवासी गाड्या एकाएकी स्पेशल ट्रेन झाल्या व हळूहळू त्याचे थांबे काढून घेण्यात आले. यानंतर निवेदने, मागण्या रेल्वे प्रशासनाकडे नागरिक माध्यमातून करण्यात आल्या. परंतु सगळ ऊलट घडत गेले कोरोना आला अन् नांदगाव रेल्वे स्थानकाला अधोगतीकडे घेऊन गेला? असे युवा फाउंडेशनने निवेदन दिले आहे.