देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीत नगरपंचायतीने भुयारी गटारींचे काम पूर्ण केल्यानंतर गटारीसाठी खोदकाम केलेल्या कॉलनी रस्त्याची अद्याप दुरूस्ती केलेली नाही, त्यातच ह्या कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रहिवासी त्रस्त झाले असून ह्या रस्त्याची दुरुस्ती करावी व कॉलनी रस्त्याने सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र. १६ मध्ये वाजगाव व कळवण ह्या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी रामराव हौ. सोसायटी ही कॉलनी आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, रामेश्वर, कनकापूर, कांचणे, मुलुखवाडी, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा, तसेच देवळा शहराच्या पश्चिम भागातील शेतकरी आपला कांदा लिलावासाठी देवळा येथे कळवण रस्त्यावर असलेल्या नवीन बाजार समिती आवारात घेऊन येतात. ह्या कॉलनीपासून १०० मीटरवर असलेल्या देवळा शहराकडील मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून कॉलनी रस्त्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने शेतकरी घेउन जातात. यामुळे दिवसभर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. नुकतेच भुयारी गटारीसाठी झालेल्या रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही.यामुळे जाणाऱ्या वाहनांमुळे दिवसभर सर्वत्र धूळ उडत असते. घरांमध्ये मोठ्या प्रमाणात ही धूळ येते. ही धूळ घरातील वस्तूंवर बसते. यामुळे महिलावर्गदेखील त्रस्त झाला आहे. धूळ व ध्वनिप्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. ह्या कॉलनी रस्त्याची दुरूस्ती करण्यात येऊन येथून सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.गतवर्षी देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना कॉलनी रस्त्याने होणारी अवजड वाहतूक बंद करावी, अशा मागणीचे निवेदन कॉलनीतील रहिवाशांनी दिले होते. त्यावेळी कॉलनीच्या दोन्ही बाजूंना कळवण व वाजगाव रस्त्यावर ह्यअवजड वाहनांना प्रवेश बंदह्ण असे फलक लावण्याचे आश्वासन नगरपंचायतीने दिले होते; परंतु नंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
कॉलनी रस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 9:03 PM
देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीत नगरपंचायतीने भुयारी गटारींचे काम पूर्ण केल्यानंतर गटारीसाठी खोदकाम केलेल्या कॉलनी रस्त्याची अद्याप दुरूस्ती केलेली नाही, त्यातच ह्या कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रहिवासी त्रस्त झाले असून ह्या रस्त्याची दुरुस्ती करावी व कॉलनी रस्त्याने सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देधूळ व ध्वनिप्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास