सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव शिवारातील गावपाट तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्रकल्प अधिकारी बी. एस. साळुंके यांच्याकडे केली.
मुसळगाव शिवारातील सिन्नर-शिर्डी बायपासच्या कामाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्रकल्प अधिकारी बी. एस. साळुंखे, टेक्निकल व्यवस्थापक डी. आर पाटील, इंडिपेंडंट इंजिनिअरचे टीम लीडर जगनमोहन रेड्डी, युटिलिटी इंजिनिअर वैभव वाजे, मॉन्टी कारलो प्रोजेक्ट हेड मधू बाबू आले होते. यावेळी उपसरपंच अनिल सिरसाट, ग्रा. पं. सदस्य दत्तू ठोक, पोलीस पाटील दीपक गाडेकर आदींनी त्यांची भेट घेऊन साकडे घातले.
रस्त्याचे काम करताना मुसळगावात जाणारे दोन्ही गावपाटाचा संपर्क तुटला असल्याने तो लवकर दुरुस्ती करून द्यावा, तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पाइपलाइन रस्त्याच्या खालून जास्त असल्याने भविष्यात त्यांना अडचणी येऊ नये म्हणून त्यांना सिमेंट पाइप टाकून मिळावा, तसेच रस्त्याशेजारील डाळींब शेती पिकांवर धूळ उडून त्यांचे नुकसान होत असल्याने त्याला त्वरित शेडनेट लावून पिकांवर पडणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करावा, तसेच रस्त्यावर पाणी मारावे, जेणे करून आजूबाजूच्या शेती पिकांना व रहिवाशांना धोका पोहोचणार नाही, अशी मागणी मुसळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली. संबंधित तक्रारीचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना साळुंके यांनी मॉन्टी कारलो प्रोजेक्ट हेड मधू बाबू यांना केल्या.
फोटो ओळी : २४ मुसळगाव १
रस्ते महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुसळगावचे उपसरपंच अनिल सिरसाट, सदस्य दत्तू ठोक, पोलीस पाटील दीपक गाडेकर आदी.
===Photopath===
240521\24nsk_38_24052021_13.jpg
===Caption===
रस्ते महामार्ग प्रकल्प अधिकार्यांशी संवाद साधताना मुसळगावचे उपसरपंच अनिल सिरसाट, सदस्य दत्तू ठोक, पोलिस पाटील दीपक गाडेकर आदी.