शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 11:38 PM

मनमाड : पालिकेच्या सभेत विरोध असलेला शॉपिंग सेंटरचा ठराव तहकूब करण्यात आला होता. मात्र नंतर इतिवृत्तात त्याची बेकायदेशीररीत्या नोंद केल्याचा आरोप करत सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमनमाड। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मनमाड : पालिकेच्या सभेत विरोध असलेला शॉपिंग सेंटरचा ठराव तहकूब करण्यात आला होता. मात्र नंतर इतिवृत्तात त्याची बेकायदेशीररीत्या नोंद केल्याचा आरोप करत सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, दि. १५ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सभेसमोर असलेल्या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी मीटिंग बोलविण्यात आली होती. मनमाड न.प. हद्दीत १४व्या वित्त आयोगाअंतर्गत साइट क्रमांक ३५ मध्ये दुकान केंद्राचे बांधकाम करणेच्या सुधारित आराखड्यास व अंदाजपत्रकास मजुरी देणेबाबत ठराव चर्चेस आल्यानंतर कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. शहराला शॉपिंग सेंटरची गरज नसून पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे. गाळे बांधण्याऐवजी सदरची रक्कम करंजवण पाणी योजनेकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. पीठासीन अधिकाºयांनी विषय क्र. १० ज्यादा चर्चेसाठी तहकूब केला. मात्र नंतर माहिती मिळाली की, तो बेकायदेशीररीत्या सदर ठराव इतिवृत्त बुकात नोंद करण्यात आला आहे. म्हणून सदरचा ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर कॉँग्रेस नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, संतोष अहिरे, सीमा निकम, मिलिंद उबाळे, नाजीम शेख यांच्यासह अर्चना जाधव, मेरी पिटर थॉमस यांच्या स्वाक्षºया आहे. दरम्यान सदरचे शॉॅपिंग सेंटरचे काम रद्द करून करंजवण योजनेसाठी निधी वापरण्यात यावा या मागणीसाठी गेल्या आठवड्यात कॉँग्रेस शहर अध्यक्ष अफजलभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते.

टॅग्स :Nagar Bhavanनगरभवन