सिन्नर : कडवा कालव्याच्या पाण्यावर पांगरी पाणीयोजनेसाठी कायमस्वरूपी आरक्षण देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पांगरी पाणी-योजनेसाठी कायमस्वरूपी आरक्षण दिल्यास मरणोत्तर अवयव दान व वैद्यकीय शाळेसाठी देहदान करणार असल्याचे बैरागी यांनी म्हटले आहे. पांगरी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचे काम १८ महिन्यांच्या मुदतीत होणे गरजेचे होते. तथापि, चार वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही काम अपूर्ण असून, संबंधितांकडून कारवाई केली जात नसल्याची तक्रार बैरागी यांनी केली आहे. सदर योजनेसाठी असलेल्या विहिरीच्या स्ट्रेंज गॅलरी न बांधताच ठेकेदार व अधिकाऱ्याने पैसे हडप केल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे. या योजनेसाठी कडवाच्या पाण्यावर आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी केली आहे. (वार्ताहर) दोषींवर कारवाई करावीपांगरी येथे विहिर, घरकुल योजनेत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे. गैरव्यवहार झाल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली. तथापि, गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप बैरागी यांनी केला आहे. गैरव्यवहारात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बैरागी यांनी केली आहे.
कडवा कालव्याच्या पाण्यावर आरक्षण देण्याची मागणी
By admin | Published: October 01, 2016 12:15 AM