येवला दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री भुजबळ यांची संपर्क कार्यालयात भेट घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सदर निवेदन दिले. कोरोना संकटकाळात आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी अद्यापही कोराना संपलेला नाही. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने अनेक कोविड सेंटर बंद केले तर काही ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेत कर्मचाऱ्यांची गरज असताना कंत्राटी कर्मचारी कमी करण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी आरोग्य सेवेत सामावून घेण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अमित पटले, सारिका खांडेकर, चेतन गिरी, मयूर वळवी, राेहित भाई, छाया म्हस्के, पल्लवी धीवर, डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. संस्कार पाटील, डॉ. अमोल बढे, सुजाता सूर्यवंशी, आशा झाल्टे, सोनाली सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.