नाशिक : भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र यशवंत विंचू (रा़ शिवपूजा सोसायटी, लोकमान्यनगर, गंगापूररोड) यांचे गंगापूररोडवरील बारदान फाट्याजवळ मालवणी हॉटेल आहे़ त्यांनी हे हॉटेल संशयित देवरे यास २० जानेवारी २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधित भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले होते़ मात्र, हॉटेलचे भाडे न देता देवरे नुकसान केल्याने विंचू यांनी हॉटेलची जागा खाली करण्यास सांगितली़ यावर देवरे याने हॉटेलची जागा खाली न करता उलट त्यांच्याकडे जागा खाली करायची असेल, तर १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली़ तसेच हॉटेलमध्ये आल्यास हातपाय तोडण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी हॉटेलमालक जितेंद्र विंचू यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून खंडणीची फिर्याद दिली़सातपूरच्या युवकाकडून गावठी कट्टा जप्तनाशिक : सातपूर महिंद्रा कंपनीच्या पार्किंगसमोर उभ्या असलेल्या युवकाकडून शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सोमवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास गावठी कट्टा जप्त केला़ योगेश चिंतामण सोनवणे (२८, रा़ महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) असे कट्टा जप्त करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे़गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई योगेश सानप यांना सोनवणेकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास महिंद्रा कंपनीच्या पार्किंगसमोरील पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले़ त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले़
हॉटेलमालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:45 AM