जवळपास एक महिन्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि कमी दाबाने होणे, थ्री फेज सप्लाय रात्री-अपरात्री सुरू होणे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, महिला, व्यावसायिक हैराण झाले आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आणि कमी दाबामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. परिसरात मुबलक पाणी असूनही शेतीला पाणीपुरवठा विजेच्या कमी दाबामुळे करता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन थंडीत रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. सातत्याने सुरू असलेल्या या प्रकाराबाबत येथील शाखा अभियंता एच. एस. मांडगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता एच. आर. खैरनार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावर त्वरित तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी बाळासाहेब घुमरे, नवनाथ नरोडे, प्रमोद नरोडे, मच्छिंद्र चिने, अमोल दवंगे, भाऊसाहेब नरोडे, संपत चिने, भाऊसाहेब चिने, भाऊसाहेब गव्हाणे, दौलत चिने, नामदेव चिने, सुभाष मोकल, शरद नरोडे, चंद्रकांत चिने, मनोज गवळी, शिवाजी दवंगे, कैलास गावडे, सुनील चिने, अरुण नरोडे, सुनील नरोडे, संदीप थोरात, संतोष बाराहाते, पंडित नरोडे, कैलास चिने, योगेश दवंगे, रामनाथ चिने, अण्णासाहेब नरोडे, गणेश शिंदे, अनिल चिने, प्रकाश चिने, भानुदास निकम, सोमनाथ घोलप, दत्तू सगर आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
पाथरे सबस्टेशनमध्ये येणारा ३३ के. व्ही.चा पुरवठा हा सिन्नरहून नांदुरशिंगोटे, वावी मार्गे येत असल्याने त्यामध्ये कमतरता निर्माण होते. तसेच कमी दाबाने पुरवठा होतो. त्यामुळे सदरचा पुरवठा हा शहा येथील सबस्टेशनवरुन पाथरेे येथे त्वरित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होईल, असे शेतकऱ्यांनी यावेळी एच. आर. खैरनार उपकार्यकारी अभियंता सिन्नर तसेच एच. एस. मांडगे शाखा अभियंता यांना सांगितले. त्यावर त्वरित कार्यवाही करावी, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले.
===Photopath===
010221\01nsk_4_01022021_13.jpg
===Caption===
पाथरे येथील शाखा अभियंता यांना निवेदन देतांना शेतकरी व ग्रामस्थ.