शहरात नागरी सुविधांचा वानवा आहे. शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वच्छतेचा ठेका दिला असला तरी शहरात चौकाचौकांमध्ये व मुख्य रस्त्यांच्या कडेला घाणीचे ढिगारे पडून आहेत. घंटागाडी वेळेवर येत नाही. डेंग्यू, मलेरिया, चिकुणगुनियासदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. शहरात स्वच्छता, खड्डे मुक्त रस्ते, पिण्याचे पाणी, पथदीप आदी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. यावेळी मनपा आयुक्त गोसावी यांनी १४ सप्टेंबरपासून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष अनंत भोसले, अनिल पाटील, त्र्यंबक पाटील, मोहन कांबळे, संदीप पाटील, दिनेश गवळी, रामदास बच्छाव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : ०९एमएसईपी ०८ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहरात नागरी सुविधा पुरवाव्यात, या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांना देताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, अनंत भोसले, अनिल पाटील, त्र्यंबक पाटील, मोहन कांबळे, संदीप पाटील, दिनेश गवळी आदी.
090921\434109nsk_31_09092021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.