वैतरणानगर : राज्यातील शिक्षण विभागात जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण आयुक्तांसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक लावून सर्व प्रश्न सोडविले जातील, असे स्पष्ट प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.राज्यस्तरीय केंद्रप्रमुख असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी नुकतीच झिरवाळ यांची भेट घेऊन गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असणाºया प्रश्नांबाबत चर्चा केली. यात केंद्रप्रमुख हे पद जिल्हा तांत्रिक सेवा क मध्ये समाविष्ट करणे, शालेय शिक्षण विभागाच्या १४ नोव्हेंबर ९४च्या प्रपत्र ई-मधील अनुक्रमांक केंद्रप्रमुखांना कायम फिरती भत्ता १६५० तात्काळ लागू करून थकबाकीसह मिळावा, जून २०१४ पासूनच्या सर्व अभावित केंद्रप्रमुखांना कायम करणे, शासननिर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ८ ते १० शाळांसाठी एक केंद्रप्रमुखपद निर्मिती केलीहोती.यावेळी केंद्रप्रमुख असोसिएशनचे राज्यनेते प्रभाकर कोठावदे, राज्य सरचिटणीस राजेंद्र नांदूरकर, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, मोहन रणदिवे, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अकबर शेख, जिल्हा सरचिटणीस शरद कोठावदे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांच्या समस्या सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:23 PM