मालेगाव : लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कापूस, सूत, वीज दर महाग झाल्याने केंद्र व राज्य शासनाने व्यावसायिकांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांच्यासह शिष्टमंडळाने राष्टÑवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. मुंबई येथे खासदार सुळे यांना साकडे घातले.मनपाचे विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांनी खासदार सुळे यांचेकडे अडचणी मांडल्या. यावेळी खासदार सुळे यांनी आपण लवकरच मालेगावी भेट देवून यंत्रमाग व्यवसाय व कापड निर्मिती प्रक्रिया जाणून घेवू. या व्यवसायासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. कमाल यांनी शिष्ट मंडळासह मंत्रालय परिसरातील यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात भेट घेतली. यावेळी सुळे यांना मालेगावी यंत्रमागावर तयार झालेली रंगीत साडी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी शाहीद रेशमवाले, दिपक मोरे आदिंसह उद्योजक उपस्थित होते.फोटो फाईल नेम : ०९ एमएसईपी ०३ . जेपीजीफोटो कॅप्शन : यंत्रमाग उद्योगातील अडचणी सोडवाव्यात या मागणीचे साकडे घालून राष्टÑवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मालेगावची रंगीत साडी भेट देताना मनपाचे विरोधी पक्षनेते अतिक कमाल, दिपक मोरे, शाहीद रेशमवाले आदि.
यंत्रमाग व्यवसायातील अडचणी सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:37 PM
मालेगाव : लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कापूस, सूत, वीज दर महाग झाल्याने केंद्र व राज्य शासनाने व्यावसायिकांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांच्यासह शिष्टमंडळाने राष्टÑवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. मुंबई येथे खासदार सुळे यांना साकडे घातले.
ठळक मुद्दे मुंबई येथे खासदार सुळे यांना साकडे घातले.