अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी तसेच मानरेगाअंतर्गत केलेल्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी आधारकार्ड ही प्रमुख गरज बनली आहे. त्यासाठी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठच्या गावात स्वतंत्र आधारकार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी डीवायएफआय युवा महासंघाने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर बाबतीत प्रशासनाने जनतेचा सकारात्मक विचार करून तालुक्यातील सुरगाणा शहरासह बोरगाव, उंबरठाण, बाºहे, मनखेड, पळसन, पांगारणे आदी प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावांत स्वतंत्र आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे.निवेदनावर डीवायएफआय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित गावित, पांडुरंग गायकवाड, अशोक धूम, नितीन पवार, परशराम गावित, तुळशीराम खोटरे, नितीन गावीत, राहुल गावीत, योगेश जाधव आदींच्या सह्या आहेत.
सुरगाण्यात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 8:47 PM