शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

ग्रामीण भागात बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 8:17 PM

नांदूरशिंगोटे : लॉकडाऊननंतर प्रथमच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीपर्यंत आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांची ये-जा वाढली. त्यामुळे आता बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देशाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

नांदूरशिंगोटे : लॉकडाऊननंतर प्रथमच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीपर्यंत आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांची ये-जा वाढली. त्यामुळे आता बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथून, तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नोकरदार तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात, तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी संगमनेर, लोणी, सिन्नर व दोडी येथे विद्यार्थी जातात.लॉकडाऊनमुळे बस फेऱ्या बंद केल्या होत्या, तर अनलॉकनंतर महत्त्वाच्या ठिकाणच्या कमी प्रमाणात बस फेऱ्या सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागात बस फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद होत्या, तरी काही अडचण येत नव्हती, परंतु शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेत पायी जात आहेत, तर काही सायकलने. ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थाची गैरसोय टाळण्यासाठी सिन्नर व संगमनेर आगारातून ग्रामीण भागात सुटणाऱ्या बस फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी पंचायत समितीच्या सभापती शोभा दीपक बर्के यांनी यांच्यासह विद्यार्थी, पालक करीत आहेत.सिन्नर - संगमनेर बस पूर्ववत सुरू करानाशिक - पुणे महामार्गावरील, तसेच सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून नांदूरशिंगोटे गावाची ओळख आहे. येथील बस स्थानकात दररोज शेकडो बसेस ये-जा करत आहेत, परंतु कोरोना काळात सिन्नर आगारातील काही बसेस बंद होत्या. अलीकडच्या काळात काही बसेस सुरू झाल्या आहेत, परंतु मुक्कामी बसेस अद्यापही सुरू न झाल्याने ग्रामीण भागात प्रवाशांची अडचण होत आहे. ग्रामीण भागातील बसेस पूर्ववत सुरू झाल्यास परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल. सिन्नर ते संगमनेर बस सुरू झाल्यास नांदूरशिंगोटे व दोडी परिसरातील प्रवाशांची अडचण दूर होणार आहेत.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBus Driverबसचालक