---------------------------------------------------------
चिंचावड ग्रामपंचायतीत श्रीराम-सिध्देश्वरला पाच-पाच जागा
मालेगाव : तालुक्यातील चिंचावड येथील श्रीराम आणि सिद्धेश्वर पॅनलला ग्रामपंचायत निवडणुकीत पाच-पाच जागा मिळाल्या. त्यात श्रीराम पॅनलतर्फे प्रवीण गांगुर्डे, यमुनाबाई देवरे, माधव काकळीज, मीना भामरे आणि लता गांगुर्डे निवडून आले. सिद्धेश्वर पॅनलतर्फे देविदास देवरे, जयंत चव्हाण, शोभा पवार, अशोक देवरे, यशोदा गुंजाळ निवडून आले. ३ जण बिनविरोध निवडून आले. आता तिघांवर दोन्ही पॅनलचे भवितव्य अवलंबून आहे.
------------------------------------------------------
मनोरुग्ण - भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
मालेगाव : शहरातील मनोरुग्ण व भीक मागणाऱ्यांचा महानगर पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष जगदीश गोऱ्हे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील अनेक भागात मनोरुग्ण व भीक मागणाऱ्यांसह गर्दुल्यांची संख्या वाढली आहे. त्यांचा महिलांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कॅम्पातील रावळगाव नाका, सोमवर बाजार भागात तर उद्रेक झाला आहे. अनेक जण सकाळी महिलांच्या मागे फिरतात. तसेच मारहाणही करतात. महापालिकेने अशा मनोरुग्णांचा बंदोबस्त करावा,
---------------------------------------------------
मालेगाव एसटी आगारात वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
मालेगाव: शहरातील नवीन बसस्थानक आवारात रस्ता सुरक्षा मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक किरण धनवटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे सतीश कलंत्री होते. यावेळी कलंत्री यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सहायक कार्यशाळा अधीक्षक मीनल मिटके, वाहतूक निरीक्षक ए. आर. तरवारे, राजेंद्र शेलार, देवेंद्र माळी, चालक, वाहक, सहायक वाहतूक निरीक्षक एन. एन. उशीरे, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव माळी यांनी केले.