पाटणे : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका, ज्वारी खरेदीचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतल्याची माहिती विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. प्रथमच रब्बी हंगामात भरड धान्य खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला.मार्केटिंग फेडरेशनने तात्काळ मका खरेदी सुरू करावी कारण लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान होत असून, संपूर्ण बाजारपेठा बंद असल्यामुळे पिकविलेला माल कोठे विकावा या समस्येने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच मका उघड्यावर पडला आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. मका खराब होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे खरेदीसाठी पैसे कसे उभारावे या विवंचनेत बळीराजा त्रस्त झाला आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक असून, धान्य खरेदीच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली तरच बळीराजाला दिलासा मिळू शकेल.मका उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने तात्काळ मका खरेदी केंद्र ग्रामीण भागात सुरू करून शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ अहिरे, निंबा बागुल, मधुकर धनवट, केदा रोकडे, कृष्णा खैरनार, बाळासाहेब वाघ, कैलास शेवाळे आदी शेतकºयांनी केली आहे.-------------------------४शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी भावाने धान्य विकावे लागू नये म्हणून सतराशे साठ रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत ठरवून देण्यात आली आहे. मार्केटिंग फेडरेशन ही योजना तात्काळ राबवण्याची मागणी पाटणे४परिसरातील शेतकºयांनी केली आहे. ५१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये कोरोना विषाणूपासून काळजी कशी घ्यावी हे आता सगळ्यांनाच माहीत झाले असल्याकारणाने आता सर्व व्यवहार पूर्ववत होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मालेगाव शहर सोडून खरेदी केंद्र उभारले तर ही योजना तात्काळ यशस्वी होऊ शकेल.
मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:33 PM