ठळक मुद्दे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायखेडा : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भेंडाळी येथील प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत टामटा लिलाव सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्याकडे केली आहेनिफाड आणि सिन्नर सरहद्दीवर असणाºया भेंडाळी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये टमाटे पिकाचीलागवड केली जाते. या भागातील टमाटे विक्री करण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना नाशिक किंवापिंपळगाव येथे घेऊन जावे लागतात. वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो.यावेळी शिंगवेचे उपसरपंच धोंडीराम रायते, विष्णुपंत डेर्ले, चंदू रायते, भूषण शिंदे, संजय डेर्ले रामेश्वर मोगल यांचा अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.