आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकरोड येथे बिटको रुग्णालय आणि खोले मळा येथे लसीकरण केंद्र आहेत. मात्र आगामी काळात लसीकरणाला होणारी गर्दी लक्षात घेऊन तरण तलावाच्या आवारात केंद्र सुरू करण्याची गरज आहे. हे मध्यवर्ती ठिकाण असून, तेथे मोठी सभागृह आहेत. याठिकाणी पार्किंगसाठी सुविधा आहे. आनंदनगर, जगताप मळा, धोंगडेनगर, पंजाब कॉलनी, गायखे कॉलनी, फर्नांडिसवाडी, लोणकर मळा, शिखरेवाडी, गंधर्वनगरी, पंजाब कॉलनी, सहाणे मळा आदी भागातील लोकांना या केंद्राचा लाभ होऊ शकतो. लसीकरण केंद्रासाठी मंडप, फर्निचर, लॅपटॉप व इतर साहित्य लागल्यास आपण आपल्या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करू. तरी येथे केंद्र सुरू करावे, अशी मागणी पत्रात केली आहे.
खोले मळा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:16 AM