पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, वारेगावच्या ग्रामपंचायतीमार्फत लस उपलब्ध होण्यासंदर्भात लेखी पत्र देऊन मागणीही करण्यात आली आहे. लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करून ग्रामस्थांना लस उपलब्ध करून द्यावी, अशा आशयाचे पत्रही संबंधित खात्याला देण्यात आले आहे. जवळपास एक महिन्यापूर्वी पहिल्या डोसचे नियोजन करण्यात आले होते. अजूनही पहिल्या डोससाठी अनेक ग्रामस्थ वाट पाहत आहेत, तर दुसऱ्या डोसचीही मागणी वाढली आहे. परिसरात कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने जास्तीत जास्त ग्रामस्थांचे लसीकरण होणे आवश्यक आहे.
ग्रामस्थांनी पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतीमध्ये जवळपास १००० व्यक्तींची नाव नोंदणी झाली आहे. जेणेकरून लवकरात लवकर लस मिळेल या अपेक्षेने नाव नोंदणी झालेली आहे. परंतु अजूनही या परिसरात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नाही. पाथरे गावाच्या लोकसंख्येनुसार लसीकरण त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.