नाशिक : महापालिकेच्या अमरधाममध्ये सध्या एकच शव आणि गॅस शवदाहिनी असल्याने कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराला विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व विभागात विद्युतदाहिनी सुरू करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात गॅस शवदाहिनी नादुरुस्त झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. तथापि, कोरोनाबळींवर कसे अंत्यसंस्कार करावे याबाबत शासनाचे नियम असून, त्यानुसारच अंत्यसंस्कार करावे यासाठी महापालिकेच्या सहाही विभागात विद्युतदाहिनी सुरू कराव्यात, अशी मागणी शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, नंदिनी बोडके, सलीम शेख, वैशाली भोसले, यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी निवेदनात केली आहे.
सर्व विभागात विद्युतदाहिनी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 12:08 AM
नाशिक : महापालिकेच्या अमरधाममध्ये सध्या एकच शव आणि गॅस शवदाहिनी असल्याने कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराला विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व विभागात विद्युतदाहिनी सुरू करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
ठळक मुद्देगॅस शवदाहिनी नादुरुस्त झाल्याने मोठी समस्या