या मांजामुळे नागरिकांचे विशेषत: वाहनधारकांचे नाक, कान, गळे चिरण्याच्या घटना गेल्या काही वषार्ंत शहरात पतंगोत्सवाच्या सुमारास घडून येत आहेत. यात पक्षी देखील मोठया प्रमाणात जखमी होत आहेत. मकरसंक्र ांतीनंतर झाडांवर अडकलेला हा मांजा पक्ष्यांसाठी अधिक घातक ठरत आहे. पक्षी आण िमानवाला होणारा धोका लक्षात घेता राज्य सरकारने त्याच्या विक्र ीवर बंदी घातली. पर्यावरण (संरक्षण) कायदयानुसार राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मांजावर बंदी घालण्यासाठी ‘पेटा’ या संस्थेने याचिका दाखल केली होती. तसेच सरकारच्या प्राणी कल्याण मंडळाला आवाहन करून मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. याचदरम्यान केंद्राच्या पर्यावरण, वने आण िहवामान बदल विभागालाही यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने नायलॉन मांजा विक्र ीवर बंदी घातली आहे. हा मांजा विकताना कुणी आढळल्यास संबंधित विक्र ेत्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही यात दिले आहेत. मात्र, शहरातील दुकानांमध्ये नायलॉन मांजा आढळून येत असून त्यावर खरोखरच कारवाई केली जाणार का, असा प्रश्न आहे. असे असतांनाही पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. नायलॉन मांजामुळे शहर व परिसरात मोटारसायकलस्वरांचे अनेक अपघात झालेले आहे. काहींना त्यात आपला जीव देखी गमवावा लागला आहे. या व्यापाºयांना नायलॉन मांजा विक्र ी न करण्याची सक्त ताकिद करावी व विक्र ी करतांना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सह पदाधिकारी उपस्थित होते.(२५ येवला मांजा)