निकवेल : आदिवासी वस्तीवर अवैध व्यवसायनिकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल येथे कायमस्वरूपी अवैध गावठी दारू बंद करण्याची मागणी निकवेल येथील सरपंच रामचंद्र मोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पुंजाराम वाघ, उपाध्यक्ष धर्मेंद्र महाजन, पोलीसपाटील विशाल वाघ यांनी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना निवेदन देण्यात आले.निकवेल येथील आदिवासी वस्तीवर अवैध गावठी दारू व देशी दारू मोठ्या प्रमाणावर विक्र ी होत आहे. त्यामुळे गावांमध्ये रोज भांडणे, तसेच विविध घडामोडी घडत असतात त्यामुळे गावातील ग्रामस्थ वैतागले असून, त्वरित निकवेल येथील अवैध गावठी, देशी दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, पोलीस निरीक्षक बशीर शेख यांची येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन तत्काळ दारू बंद करण्याची मागणी केली आहे.यावेळी पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी निकवेल येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रति राज्य उत्पादन शुल्क विभागाला तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.यावेळी सरपंच रामचंद्र मोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुंजाराम वाघ, उपाध्यक्ष धर्मेंद्र महाजन, पोलीसपाटील विशाल वाघ, यशवंत सोनवणे, नीलेश वाघ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावठी दारूविक्री बंद करण्याची मागणी
By admin | Published: September 14, 2016 10:13 PM