शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 8:47 PM

देवळा : महालपाटणे व परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसल्यामुळे गैरसोय होत असून दुपारी बारा वाजता बस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन महालपाटणेतील विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पी. एच. महाजन यांना दिले.

ठळक मुद्देसटाणा : सहाय्यक वाहतूक अधीक्षक महाजन यांना निवेदन

देवळा : महालपाटणे व परिसरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसल्यामुळे गैरसोय होत असून दुपारी बारा वाजता बस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन महालपाटणेतील विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पी. एच. महाजन यांना दिले.महालपाटणे, निंबोळा, रण्यादेवपाडा, देवपूरपाडा या परिसरातून शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी मेशी व देवळा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बसने नियमितपणे येतात. सकाळी महाविद्यालयीन वेळेत विद्यार्थ्यांना बस असते. परंतु बारा वाजेनंतर विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी बस नसल्याने पायपीट करावी लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.विद्यार्थिनींचे सर्वाधिक हाल होत असून दररोजच्या पायपीटीमुळे कंटाळलेल्या विद्यार्थीनींमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाल्यामुळे शिक्षण सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सटाणा आगाराने दुपारी बारा वाजेच्या सुमारास देवळा ते महालपाटणे अशी बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महालपाटणे ग्रामपंचायतीच्या वतीने सटाणा आगाराकडे करण्यात आली आहे.यावेळी ज्ञानेश्वर देवरे, सरपंच जिजा नवरे, सागर खरोले, सुनील सावंत, गणेश सूर्यवंशी, राकेश सोनवणे, योगेश आहेर, किरण अहिरे, युवराज शेलार, चेतन चित्ते, किरण खैरनार, महेश खरोले, नंदू अहिरे, राहुल शेवाळे, रोशन महिरे, प्रवीण पवार, आदित्य सूर्यवंशी, तेजस अहिरे, दिनेश मोरे, अभिजित गोसावी, ज्ञानेश्वर पवार, सागर चव्हाण, राहुल खरोले, समाधान कुमावत, दिनेश देवरे, साईनाथ डावरे आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.