झोडगे : मालेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या पूर्ण केल्या असून पावसाने उसंत दिल्यानंतर निंदणी खुरपणी कामाला वेग आला आहे. नेमके याच दरम्यान गेल्या दहा दिवसापासून मालेगाव तालुक्यात युरिया खत गायब झाल्याने शेतकऱ्यांना नवीनच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मालेगाव तालुक्याच्या माळमाथा व इतर भागात जोरदार पावसाने आधीच शेतकºयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. अनेकांच्या शेतात अजूनही पाणी असल्याने पेरणी झालेली नाही तर इतर शेती क्षेत्रावर झालेल्या पेरणी नंतर मका कपाशी या पिकांची निंदणी खुरपणी पूर्ण होत असून खतांची नितांत आवश्यकता आहे पण अशातच गेल्या दहा दिवसांपासून खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर तातडीने उपाययोजना करून शेतकºयांना खते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.-------------------शेतकºयांसमोर संकटखतांची नितांत गरज आहे त्यात युरिया खत अत्यावश्यक असून शासनाने याची तातडीने दखल घेत खते उपलब्ध करून द्यावीत आधीच कोरोना ने मंदीचा मार झेल णाºया शेतकºयांना अति पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे.अनेकांनी दुबार पेरणी केली आहे आपली पिके सावरत असताना खर्च वाढतो आहे आणि अशातच खतांचा तुटवडा जाणवत असल्याने नवीनच समस्या उभ्या राहत आहेत याची तातडीने दखल घेण्यात येऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी तालुक्यातील शेतकºयांची मागणी आहे.