चांदवड : ४२ खेडी नाग्या साक्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी तालुक्यातील पूर्व भागातील १६ खेड्यांना दिले जाते; मात्र ते वेळेवर व व्यवस्थित मिळत नाही अशी तक्रार करण्यात आली आहे. या पाण्याची दहा-दहा दिवस वाट बघावी लागते. चार दिवसात तरी या योजनेचे पाणी मिळावे अशी मागणी जनतेची आहे. या योजनेची पाइपलाइन लिकेज असून, ते त्वरित दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुड धरणाचे पूरपाणी दुगावपर्यंत येत आहे. ते दरेगाव, निमोण, डोणगावपर्यंत आणावे त्यामुळे शेतीला पाणी मिळेल. यासह तालुक्यात विविध समस्या असून, त्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी राष्टÑीय कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भीमराव जेजुरे यांनी चांदवड-देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर व संबंधितांना निवेदनाद्वारे केली आहे. मनमाड-गिरणारे रस्त्यावरील घाटाचे काम मंजूर असून, ते झालेले नाही. ते काम त्वरित सुरू करावे, मनमाड ते दरेगाव दरम्यान रस्त्यावर तीन पूल आहेत त्यांना संरक्षक भिंती लावाव्यात, मनमाड ते गिरणारे रस्त्यालगत दोन किमी अंतरावर वळण रस्ता आहे तो सरळ करावा, डोणगाव सजेला तलाठी नाही तो त्वरित द्यावा, डोणगाव-निमोण रस्त्याच्या अर्धा किलोमीटरचे खडीकरण व डांबरीकरण झालेले नाही ते करण्यात यावे, या रस्त्यावर डोणगावजवळ फरशी आहे तेथे उंच करून बसवावी जेणेकरून विद्यार्थ्यांना निमोणला जाताना अडचणी निर्माण होतात. निमोण येथील मंजूर सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करावे, अशा मागण्यांचे निवेदन भीमराव जेजुरे यांनी आमदार डॉ. अहेर व संबंधितांना दिले. चांदवड येथील प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालयात येणाºया ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दोन्ही कार्यालयात दलालांनी घेरले असून, त्यात बदल करावा, प्रांत व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची वागणूक नागरिकांना योग्य मिळत नाही. अधिकाºयांना कार्यालयात भेटण्यासाठी व कामासाठी नागरिक जातात, त्यांना वाईट वागणूक दिली जाते. नागरिकांची कामे करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जात नाही व कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. - भीमराव जेजुरे, जिल्हा सरचिटणीस राष्टय कॉँग्रेस
पूरपाणी डोणगावपर्यंत नेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:22 AM