शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

महिनाअखेरीस टॅँकरची मागणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:14 AM

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२० च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे ...

यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा असला तरी, सन २०२० च्या तुलनेत काहीसा कमी आहे. तरीदेखील पिण्यासाठी पुरेसे पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. तथापि, जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पाणी साठवणुकीची पुरेशी साधने नसल्याने या तालुक्यांमध्ये दरवर्षीच पाण्याची टंचाई भासते. त्याचबरोबर टंचाई पाचवीला पुजलेल्या बागलाण, नांदगाव, मालेगाव, देवळा या तालुक्यांना दरवर्षीच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यंदा मार्च उजाडला तरी, अद्याप पाण्यासाठी फारशी ओरड नसली तरी, सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, यंदा हवामान खात्याने उन्हाळा कडक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत नद्या, नाल्यांची पाणीपातळी कमी होऊन शेतकऱ्यांच्या विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचा हंगामही संपुष्टात येत असल्याने शेतीसाठी पाण्याची गरज जवळपास संपली आहे. मात्र उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास मार्च अखेरीस पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्याचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून, उन्हाळ्यात ६०४ गावे व ७१८ वाड्या अशा प्रकारे एकूण १३२२ गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यावर उपाययोजनासाठी अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. टंचाई कृती आराखड्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांतील एकाही कामाचे प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी आराखडा कागदावरच राहिला आहे.

-------

जिल्ह्यातील एकूण गावे - १९१७

बोरअरवेलची दुरुस्ती होणार - ८

पाणीटंचाईची समस्या भेडसावणारी गावे - १३२२

बोअरवेलचे जिल्ह्यात खोदकाम होणार - २४४

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करणार - १४

नळयोजनेचा पूर्ण करणार - ६५

--------

आराखड्यात होणार १४९५ कामे

टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४९५ कामे केली जाणार असून, त्यात प्रगतीतील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळयोजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहित करण्याची कामे केली जाणार असून, या उपरही पाणीटंचाईची समस्या दूर न झाल्यास टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

-------

८६१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणार

जिल्ह्यातील १३२२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून सर्व उपाययोजना राबवूनही ज्या गावांमध्ये पाण्याचे स्रोत नाहीत अशी ८६१ गावे, वाड्यांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

--------

धरणातील पाण्याचे नियोजन

जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरणांमध्ये सध्या ५८ टक्के इतका जलसाठा असून, यातील सिंचनाचे आरक्षण वगळता उर्वरित पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यात कालव्याद्वारे नळपाणी योजनांसाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

-------

२६० विहीरींचे अधिग्रहण करणार

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाहीत अशा गावांमध्ये शेतकऱ्यांकडील खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यात १८५ गावे व ७५ वाड्यांमधील २६० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्या मोबदल्यात विहीरमालकाला मोबदला अदा करण्यात येणार आहे.