येवला : कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्रित दिल्याने सर्वसामान्य वीजग्राहकांना धक्काच बसला आहे. कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेल्या वीजग्राहकांना महावितरणने बिल भरण्यासाठी टप्पे करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका समन्वयक धिरज परदेशी यांनी एका निवेदनाद्वारे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांकडे केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच छोटे-मोठे उद्योग व्यवसाय ठप्प झाले, तर कष्टकरी, मजूर, सर्वसामान्य बेरोजगार झाले. सर्वच आर्थिक संकटाचा सामना करीत असताना महावितरणने लॉकडाऊन व संचारबंदी काळातील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्रित देऊन ग्राहकांना शॉक दिल्याचे परदेशी यांनी म्हटले आहे. हजारो रुपयांचे वीजबिल भरायचे कसे असा प्रश्न सर्वांनाच पडल्याने वीजग्राहकांना बिले भरण्यासाठी तीन टप्पे करून द्यावे, म्हणजे भरता येईल, असे सदर निवेदनात परदेशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, निवेदनप्रसंगी परदेशी यांचे समवेत शाकीर शेख कादीर, मुकुंद लक्ष्मण साठे उपस्थित होते.(फोटो २८ येवला १))------------
वीजबिलांचे तीन टप्पे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 6:18 PM