या आरोग्यकर्मींची भविष्य निधीची रक्कम पगारातून कापून घेतली जाते, पण पीएफ खात्यात व मनपा समभागाची रक्कम जमा करण्यात आली नाही. आरोग्यकर्मींची सेवा एक प्रकारे खंडित करण्याचा घाट आरोग्य विभाग करत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व त्यांच्या हक्काची भविष्य निधी रक्कम मिळावी, तसेच २००५ साली साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात आलेल्या व शासन नियमाने मनपा सेवेत कायम केलेल्या आरोग्यसेवक धर्तीवर मनपात पुढील भरतीत विशेषतः आरोग्य विभागाच्या रिक्त दोन हजार जागा भरतीत कोरोना योद्ध्यांना प्राथमिकता द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अंकुश पवार, मनसे गटनेता नंदिनी बोडके, मनोज घोडके, सत्यम खंडाळे, राकेश परदेशी, खंडू बोडके, अजिंक्य बोडके, अक्षय कोंबडे, बंटी लभडे उपस्थित होते.