सिन्नर : नाशिक-पुणे महार्गावर शिंदे गावाजवळ झालेल्या टोलनाक्यावर सिन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, छोटे-मोठे उद्योजक, कामगार, नोकरदार व इतर वाहनधारकांकडून टोलवसुली केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल वसूल न करण्याचा आदेश देऊन परिपत्रक आले नसल्याचे कारण दिले जात आहे. सिन्नर तालुक्यातील वाहनचालकांकडून टोलवसुली करण्यात येऊ नये अशी मागणी कॉँग्रसचे शरद शिंदे यांनी केली आहे. नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येऊन टोल वसुलीस प्रारंभ झाला. तथापि चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असताना सर्रास टोलवसुली केली जात आहे. रस्त्यातील वाहतूकवासीयांच्या जमिनी संपादित केल्या, आज त्याच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतून गेलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना टोल भरावा लागतो, यापेक्षा दुसरे दुर्दैव नसल्याची खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. आजही सदरच्या टोलनाक्यावरून वसुली सुरूच असून जी. आर. मिळाला नसल्याचे कारण देत संबंधित कर्मचाºयांकडून वाहनधारकांना सांगितले जात आहे.
टोलवसुली बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:36 AM