शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जालना येथून सिंहस्थासाठी रेल्वेगाडीची मागणी

By admin | Published: August 03, 2015 10:33 PM

कुंभमेळा : नाशिकसह मराठवाड्यातील प्रवाशांची गैरसोय

कसबे सुकेणे : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह मराठवाड्यातील भाविकांसाठी जालना येथून नाशिक पॅसेंजर रेल्वेगाडी सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सिंहस्थात मराठवाड्यातून नाशकात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने आजवर मध्य रेल्वेमार्गावर लांब पल्ल्याच्या सिंहस्थ कुंभमेळा स्पेशल रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. परंतु या गाड्यांना औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक व ठाणे या जिल्ह्यांच्या लहान रेल्वेस्थानकांवर थांबा नसल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांची पर्वणी स्रानांच्या काळात गैरसोय होणार आहे. कुंभमेळ्यासाठी आजवर सोडण्यात आलेल्या रेल्वेगाड्या ह्या मध्य रेल्वेमार्गावर असून, मराठवाड्यातील व नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लहान स्थानकांवरून चढउतार करणाऱ्या भाविकांचा विचार केला गेला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मराठवाड्यातूनही लाखो भाविक येणार असल्याने दक्षिण मध्य रेल्वेने जालना, नगरसूल, मनमाड, नाशिकरोड अशी पॅसेंजर गाडी सोडावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती तसेच नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेने केली आहे. तसेच भुसावळहून नाशिकरोड जाणाऱ्या कुंभ स्पेशल गाड्यांना म्हसावद, पाचोरा, कजगाव, न्यायडोंगरी, नांदगाव, लासलगाव, निफाड, कसबे सुकेणे या स्थानकांवर दोन मिनिटांचा थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी केली आहे. जालना ते नगरसूल या पॅसेंजर गाडीचा इगतपुरीपर्यंत विस्तार करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. तसा डेमोही यशस्वी झाला. परंतु कुठे माशी शिंकली कोण जाणे, ही पॅसेंजर अद्याप सुरू न झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या घोषणा केवळ कागदोपत्रीच का, असा सवाल प्रवासी व्यक्त करीत असून, इतर जलद गाड्यांपेक्षाही जास्त या पॅसेंजरला प्रतिसाद लाभेल, असेही प्रवाशांनी सांगितले. (वार्ताहर)