फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
नाशिक : सायंकाळी सातनंतर दुकाने बंद होत असल्याने मद्यविक्रीच्या अनेक दुकानांमध्ये या वेळेत गर्दी होते असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. काही दुकानदारांनी बॅरिकेटिंग केले असले तरी काही ठिकाणी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा दुकानदारांना संबंधीत विभागाने समज द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
ग्राहकांना सवलत देण्याची मागणी
नाशिक : महावितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्राहकांना कंपनीने वीजबिल भरण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरातील विविध भागात कामांचा धडाका
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात अनेक कामे सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांच्या कामांसाठी खडी टाकण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
कमी दाबाने पाणी पुरवठा
नाशिक : शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने पाणीपुरठा सुरळीत करावा, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.
पाणी उकळून पिण्याचा सल्ला
नाशिक : बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करुन प्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना पोटाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे.