सातपूर : औद्योगिक वसाहतीत जवळपास ५० टक्के रिक्त असलेल्या जागा वापरात आणाव्यात, दिंडोरी येथील औद्योगिक भूखंडांचे दर कमी करावेत यांसह विविध मागण्यांबाबत निमाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय काटकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.नाशिक दौºयावर आलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर यांची नाशिकच्या प्रादेशिक कार्यालयात निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, खजिनदार कैलास आहेर, कार्यकारिणी सदस्य नंदलाल शिंदे लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन आदींसह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील उपस्थित होत्या. उद्योगप्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत विविध औद्योगिक विषयांवर चर्चा झाली. यावेळी निमा शिष्टमंडळाने विविध प्रश्न मांडले.या सर्व मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन काटकर यांनी निमा पदाधिकाºयांना दिले.आजारी उद्योगांच्यापुनरु ज्जीवनाबाबत शासन निर्णयाची प्रतीक्षा असून, त्यासंदर्भात योजना असावी. नाशिक औद्योगिक वसाहतीत जवळपास ५० टक्के रिक्त जागा असून, जास्तीत जास्त जागेचा वापर होईल, असे नियोजन व्हावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.