बुधवारी (दि.१७) झालेल्या भेटीत केंद्र सरकारच्या नियमावलीत थोडेच कामगार प्रतिबंधक लस घेण्यास पात्र होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसे न करता कायमस्वरूपी साडेचार हजार, तर कंत्राटी अडीच हजार कामगारांना एकाचवेळी प्राधान्याने कोविड प्रतिबंधक लस देण्यासंदर्भात नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. आरोग्यमंत्र्यांनी यावर लवकरच सकारात्मक पावले उचलून तातडीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी नाशिक विभाग कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे, उपाध्यक्ष जितू जाधव, कमलेश धिंगाणे, संतोष आहेर यांच्यासह इतर कामगार उपस्थित होते.
फोटो : १८ एचएएल एम्प्लाई
एचएएल कामगारांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना अनिल कदम, सचिन ढोमसे, जितू जाधव, संतोष आहेर, कमलेश धिंगाणे आदी.
===Photopath===
180321\18nsk_53_18032021_13.jpg
===Caption===
फोटो : १८ एचएएल एम्प्लाई एचएएल कामगारांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना अनिल कदम, सचिन ढोमसे, जितू जाधव, संतोष आहेर, कमलेश धिंगाणे आदी.