निफाड : तालुक्यात कोविड-१९ लसीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.निफाड तालुक्यात शासनाच्या आदेशाने गेल्या १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ लसीकरण सुरू झाले आहे. तालुक्यात फक्त पिंपळगांव बसवंत येथे लसीकरण सुरू आहे. परंतु लासलगाव परिसरातील व तालुक्यातील सरकारी कर्मचारी अधिकारी, डॉक्टर्स यांना तालुक्यातून पिंपळगाव बसवंत येथे कोविड लस घेण्यासाठी जावे लागते. त्यामुळे सदर अधिकारी कर्मचारी व डॉक्टर्स यांचा संपूर्ण दिवस त्याच कामात जातो. आपल्या कार्यपध्दतीमुळे त्यांना नाईलाजास्तव मन:स्ताप सहन करावा लागत आहे.सद्य:स्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोविड लसीकरण सुरू करावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे केली असता त्यांनी तत्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी यांना सूचना करून तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रस्तराव कोविड-१९ चे लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
निफाड तालुक्यात लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 7:08 PM
निफाड : तालुक्यात कोविड-१९ लसीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेना निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.
ठळक मुद्देतालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कोविड लसीकरण सुरू करावे