सिन्नर : कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता सेवा देणार्या एसटी कर्मचार्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची मागणी एसटी कामगार सेनेच्यावतीने प्रशासनाकडे केली आहे.
एसटी कामगार सेनेच्या प्रयत्नाने दि. ११ एप्रिल रोजी तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव, आगार प्रशासन यांच्या सहकार्यातून एसटी कर्मचार्यांना एकाच दिवशी तब्बल ७० कोविशिल्ड लसी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या कर्मचार्यांचा पहिला डोस घेऊन ४५ दिवसांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. तरी या कर्मचार्यांना दुसरा डोस त्वरित उपलब्ध करून द्यावा. तसेच लस न घेतलेल्या उर्वरित अधिकारी, कर्मचार्यांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत प्रशासनाने पाठपुरावा करण्यात यावा, असे एसटी कामगार सेनेच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.