गतवर्षी व यावर्षीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्य माणसाचा रोजगार हिरावला गेला. उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झाले. व्यावसायिकांनाही दुकाने बंद असल्याने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे येवला शहरी भाग व तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक आधार मिळावा यासाठी पाणीपट्टी व घरपट्टी माफ करून दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर युवासेनेचे तालुका अध्यक्ष अरुण शेलार, युवासेना जिल्हा सरचिटणीस महेश गोडसे, युवासेना शहर अधिकारी लक्ष्मण गवळी, सारीभाई अन्सारी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
फोटो - २७ येवला ३
येवला तालुक्यातील जनतेची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देताना युवासेनेचे अरुण शेलार, महेश गोडसे व लक्ष्मण गवळी आदी.
===Photopath===
270521\27nsk_31_27052021_13.jpg
===Caption===
येवला तालुक्यातील जनतेची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देताना युवासेनेचे अरुण शेलार, महेश गोडसे व लक्ष्मण गवळी आदी.