सद्यस्थितीत शेती व जनावरांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून पालखेड पाटबंधारे विभागाकडे मागणी करूनही पाणी मिळालेले नाही. परिणामी गहू, कांदे आदी पिके पाण्याअभावी धोक्यात आल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
पाटबंधारे विभागाने शेतकरी हितासाठी तातडीने पाणी न सोडल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्गाने निवेदनाच्या शेवटी दिला आहे. निवेदनावर शिवाजी पगारे, प्रमोद उंडे, कल्पना कु-हे, चंद्रकांत आढाव, जगन पवार, रामभाऊ रोठे आदींसह पिंपळखुटे बुद्रुक व भुलेगाव येथील शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
कोट....
सदर बंधा-याची गळती थांबवावी, याबरोबरच अवैध उचल पाणी थांबवावे. चारी रुंदीकरण करायला हवे, तर धरणांत पिके घेतात हे देखील थांबवायला हवे. बंधा-यावर रखवालदार द्यावा, तसेच मत्स्यव्यवसाय सुरू करून सर्वाना न्याय देणे गरजेचे आहे.
- कल्पना कु-हे, चेअरमन, नाशिक जिल्हा दूध संघ