-----
मुंगसे कांदा मार्केट आज बंद
मालेगाव : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंगसे कांदा खरेदी - विक्री केंद्रावरील व्यापाऱ्यांनी मंगळवारी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कसमादे परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
-----
मालेगाव परिसरात थंडीचा जोर वाढला
मालेगाव : परिसरात थंडीचा जोर वाढू लागला आहे. रब्बी पिकांना थंडी ही पोषक आहे. सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. नागरिक उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
-----
निड्ल्स टाकण्याची मागणी
मालेगाव : शहरालगतच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर निड्ल्स टाकाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. गिरणा नदीचा प्रवाह बंद झाला आहे. धरणात निड्ल्स् टाकल्या तर मोठ्या प्रमाणात जलसाठा होणार आहे. या जलसाठ्याचा चंदनपुरी, टेहरे, सोयगाव, दाभाडी गावांना फायदा होणार आहे.
------
रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य
मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहे. धुळीमुळे विकारांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून रस्त्यांवरील धूळ साफ करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----