राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नवीन रस्त्यावर गतिरोधक तयार केले आहेत; मात्र त्यावर पांढरे पट्टे न मारल्यामुळे हे गतिरोधक लक्षात येत नाहीत. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. चौफुलीवर गतिरोधक हे पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहने जोरात आदळतात. येवला-नांदगाव रोडवर राजापूर हे गाव मोठे आहे. या रस्त्यावर प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या लग्नसराई चालू असल्याने मोटारसायकलवरून जाताना गतिरोधक लक्षात येत नाही. येवला, राजापूर, नांदगाव हा रस्त्यावर भरधाव वाहने धावतात. वाहनांमुळे सातत्याने अपघात होत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. राजापूर येथून रोज ममदापूर, खरवडी, देवदरी, सोयगाव, वडाळी, लोहशिंगवे येथील वाहने तसेच महामार्गावरील भरधाव येणारी वाहनेही अपघाताला निमंत्रण देत असतात. गतिरोधकावर त्वरित पांढरे पट्टे मारावे, अशी मागणी राजापूर ग्रामस्थांनी केली आहे.
गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:15 AM