सिडको : देशात आज अराजकता वाढली असल्याने संविधान अडचणीत आले आहे. संविधान वाचवायचे असेल, तर लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत अॅड. सुजाता चौंदते यांनी व्यक्त केले.सिडकोतील सिंहस्थनगर येथील मायको हॉल येथे मानवतावादी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘संविधान संस्कृती जनमाणसात सजविणे’ या विषयावरील व्याख्यानमालेत बोलताना अॅड. चौंदते बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आर. आर. जगताप, आर. एस. भामरे, महेंद्र गायकवाड, सेवानिवृत्त अधिकारी सुभाष बोरकर, मोहन अढांगळे, लक्ष्मण कावळे, शिवदास म्हसदे, रामकृष्ण सरदार आदी उपस्थित होते. अॅड. चौंदते यांनी सांगितले की, लोकशाही वाचवायची असेल तर सर्वप्रथम लोकतंत्र वाचवावे लागेल. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज देशामध्ये अराजकता वाढीस लागल्याने संविधान धोक्यामध्ये आले असल्याचे सांगितले जात आहे. लोकतंत्र वाचवायचे असेल तर लोकांमध्ये जागृकता निर्माण करून इव्हीएम यंत्राचा विरोध करावा लागेल, असेही शेवटी अॅड. चौंदते यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रज्ञा सोनवणे यांनी तर शिवदास म्हसदे यांनी आभार मानले.संविधान समजून घेण्याची गरज : गायकवाडमहेंद्र गायकवाड यांनी सांगितले की, संविधान म्हणजे जीवनाच्या नीतिमूल्याचे संकलन होय. संविधानाने वंचित, मागास समाजास संपूर्ण भारत देशात एक सूत्रात बांधले आहे. त्यामुळे संविधान समजून घेणे ही काळाची खरी गरज असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
लोकतंत्र सक्षम करणे गरजेचे : सुजाता चौंदते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:06 AM