नाशिक : देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एनएसयूआयच्या राज्य व नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे काँग्रेस कार्यकर्ता जागर अभियानांतर्गत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२) विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार निर्मला गावित, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, सदस्य अश्विनी अहेर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिन शेख, नगरसेवक वत्सला खैरे, राहुल दिवे, ममता पाटील आदी उपस्थित होते. प्रणिती शिंदे म्हणाल्या, समाजात सुसंवादाची गरज आहे. पंतप्रधानांच्या भाषणांपेक्षा दोन व्यक्ती, दोन गटांमध्ये होणारा संवाद महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांत हा सुसंवाद हरवला आहे. जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याने देशातील लोकशाही संकटात आली आहे. परंतु तरुणांनी समाजात तेढ निर्माण करणाºया व देशाच्या अखंडत्वाला अडचणीत आणू पाहणाºयांविरोधात एकत्रित येऊन देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करतानात महिलांना बरोबरीचे स्थान मिळण्याची गरज असून याची शिकवण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरातूनच मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे करिअर करण्याची संधी देऊन मुलांमध्ये आत्मविश्वासाची निमिर्ती करण्याती गरज व्यक्त के ली.
देशातील लोकशाही धोक्यात-प्रणिती शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 5:08 PM
देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिकांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत करण्याचे पाऊल उचलले असून, यावरून देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या संकटाचा सामना करून देशातील तरुणच लोकशाहीसोबत देशाचे अखंडत्व अबाधित राखू शकतात, असा विश्वास काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देलोकशाही वाचविणे तरुणांच्या हातातआमदार प्रणिती शिंदे यांचे मत जाती, धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे प्रयत्न तरुणांना समाजातील संवाद वाढिवण्याचे आवाहन