शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:11 PM

कनाशी : नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेपासून नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव प्रा. अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी होते.

कनाशी : नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेपासून नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव प्रा. अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी होते.यावेळी जिल्ह्यातील उपस्थित प्राध्यापकांना मागण्यांबाबत शिंदे यांनी मार्गदर्शन केले व मागण्या लवकर मान्य न झाल्यास १८ जानेवारीला विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल याबाबतची रु परेषा सांगितली.त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व एचएससी बोर्डाचे सचिव आर. आर. मारवाडी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.प्रमुख मागण्यांमध्ये कायम विना अनुदान तत्वावरील मुल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरीत अनुदान द्यावे, आॅनलाईन संच मान्यतेतील त्रूटी दुर करून प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करणे, २ मे २०१२ पासून नियुक्त शिक्षकांना मान्यता व वेतन देणे, दि १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्याना जुनी पेंशन योजना लागु करणे, माहिती व तंत्रज्ञान विषय अनुदानित व अनिवार्य करणे, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करणे, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी देणे, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पुर्ववत खात्यात जमा करणे वैद्यकीय खर्च पूर्तीसाठी कॅशलेस प्रणाली सुरू करणे, यापूर्वी नियुक्त शिक्षकांना अभियोग्यता चाचणीत सुट देणे, गणित व विज्ञानाचे भाग-१ व भाग-२ असे २ स्वतंत्र पेपर सुरु करणे, अभियांत्रिकी, वैद्यकीय व औषधनिर्माण प्रवेशासाठी १२ वी बोर्डाच्या गुणांना ५० टक्के वेटेज देणे व इतर अन्य ३२ मागण्यांचे निवेदन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. आर. एन. शिंदे, प्रा. डी. जे. दरेकर, प्रा. डी. एम. कदम, प्रा. राजु पाळेकर, प्रा. एम. पी गायकवाड, प्रा. टी. एस. ढोली, प्रा. बी. पी. दवंगे, प्रा. आर. एन. निकम, प्रा. आर. बी. धनवटे,. प्रा शेवाळे , प्रा. व्ही. एम. चव्हाण, प्रा. पी. आर. पवार, प्रा. ए. टी. पवार, श्रीमती एम. डी. निचळे यांच्या हस्ते जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक