नाशिक- माळेगावी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठीही बाहेर पडता येत नसल्याने आज सकाळी मालेगाव येथे जमावाने मोतीबाग नाका येथे पोलीस चौकीत वस्तूंची मोड तोड केली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवावे लागले. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
मालेगाव येथे कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी लॉक डाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे आज सकाळी नागरिक एकत्र जमले आणि अल्लामा इकबाल पुलाजवळील पोलीस चौकीवर हल्ला चढविला आणि खुर्च्या तसेच इतर साहित्याची मोडतोड केली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण वाढीव कुमक घेऊन आले आणि त्यांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला.