शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

नाशिकचा ‘मेमरी क्लब’ देतोय ज्येष्ठांच्या स्मरणशक्तीला चालना

By vijay.more | Published: August 20, 2018 5:33 PM

नाशिक : ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी नाशिकमध्ये गत तीन वर्षांपासून ज्येष्ठांसाठी ‘मेमरी क्लब’ सुरू आहे़ ज्येष्ठांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या या क्लबमध्ये शब्दकोडी, गणितीकोडी, सजावट, चित्रकला, उलटे आकडे, उलट्या हाताने काम करणे़, अक्षरावरून शब्द तयार करणे याबरोबरच वैद्यकीय तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली जात आहेत़

ठळक मुद्देपंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना विस्मृतीज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे बौद्धिक उपक्रम

नाशिक : ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी नाशिकमध्ये गत तीन वर्षांपासून ज्येष्ठांसाठी ‘मेमरी क्लब’ सुरू आहे़ ज्येष्ठांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या या क्लबमध्ये शब्दकोडी, गणितीकोडी, सजावट, चित्रकला, उलटे आकडे, उलट्या हाताने काम करणे़, अक्षरावरून शब्द तयार करणे याबरोबरच वैद्यकीय तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली जात आहेत़

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मेमरी क्लिनिकमधील डॉ़ मंगलाताई जोगळेकर यांनी चार वर्षांपूर्वी मेमरी क्लब सुरू केला़ तर नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी सारडा कन्या विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका अनघा ताटके यांनी जोगळेकर यांच्याकडून माहिती घेत पारिजातनगरला या क्लबची सुरुवात केली़ या मेमरी क्लबने गत तीन वर्षांमध्ये तज्ज्ञ डॉ़ महेश करंदीकर, डॉ़ हितेश चौधरी, मानसोपचारतज्ज्ञ अभिजित कारेगावकर यांची व्याख्याने तसेच कार्यशाळेचे आयोजन केले होते़ तसेच मेमरी क्लबतर्फे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत औरंगाबादच्या आस्था फाउंडेशनच्या सुमारे पंधरा तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते़

साधारणत: वयाच्या साठीनंतर ज्येष्ठांना थोडे-थोडे विसरायला होते, अन् हे विसरणे हळूहळू वाढून त्यांचा परिणाम विस्मृती (डिमेन्शिया) होतो़ नाशिकरोड व पारिजातनगर येथे सुरू असलेल्या या मेमरी क्लबमध्ये सुमारे शंभर सदस्य असून दर महिन्याच्या पहिल्या व तिसºया बुधवारी वृद्धांसाठी शब्दकोडी, गणितीकोडी, चित्रकला, बुद्धीवर्धक अशी योगासने शिकविली जात आहेत़ येत्या काही वर्षांमध्ये डिमेन्शियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत जाणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असून यावर मेमरी क्लब हा चांगला उपाय ठरणार आहे़

डिमेन्शिया म्हणजे काय?मेंदूची वाढ साधारणत: २५व्या वर्षापर्यंत सुरू असते. ३५व्या वर्षानंतर पेशी कमी होऊ लागतात. मेंदूमधील पेशींची संख्या प्रचंड असल्याने अशा रीतीने हळूहळू पेशी कमी झाल्यावर मेंदूच्या कामात फारसे अडथळे येत नाहीत. पण काही व्यक्तींमध्ये या पेशी झपाटाने कमी होतात. या मुख्यत्वे बुद्धी आणि स्मृतीच्या पेशी असतात, या स्थितीला ‘डिमेन्शिया’ म्हटले जाते.

विस्मृतीपासून दूर करण्याचा प्रयत्न

मधुमेह, हृदयरोग व त्यानंतर विस्मृती (डिमेन्शिया) या आजारांचे प्रमाण वृद्धांमध्ये वाढत चालले आहे़ सद्यस्थितीत शारीरिक आरोग्याविषयी सजगता आलेली असली तरी मेंदूच्या व्यायामासाठीची जागरूकता तितकीशी नाही़ ज्येष्ठांना वाढत्या वयानुसार होणारा विस्मृती हा आजार होऊ नये यासाठी मेमरी क्लबची स्थापना केली़ यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे बौद्धिक उपक्रम राबवून डिमेन्शिया अर्थात विस्मृतीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो़- अनघा ताटके, मेमरी क्लब, नाशिक

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक