नाशिक : नाशिक महापालिकेने बंद केलेल्या अंगणवाड्या त्वरित सुरू कराव्यात तसेच ४१३ अंगणवाड्यांचे मानधन द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी महापालिकेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले. महापालिकेने ४१३ अंगणवाड्यांचे मानधन अडवून ठेवले असून, १३६ अंगणवाड्यांना पटसंख्येचे कारण दाखवून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत नाशिक महापालिकेच्या महासभेने अंगणवाडी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. परंतु महासभेचा निर्णय होऊनही प्रशासन हुकूमशाही करीत असल्याच्या निषेधार्थ शेकडो अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. महासभा सुरू असेपर्यंत आंदोलन सुरूच होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:23 AM