लोकमत न्युज नेटवर्कभगुर : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची दरवाढ केल्याने त्याच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने भगुर येथील बलकवडे चौक मार्गावर महिलांनी सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले.
राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांनी रिकामे गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून ठेवले तसेच भाजप हटाव, देश बचाव, झूटा वादा महंगाई जादा अशा विविध घोषणा दिलेले फलक हातात घेतले होते. केंद्र सरकारने बुधवारी घरगुती सिलेंडरच्या दरात दिडशे रूपयांची वाढ केल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली असून, भाजप सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. महागाई चे चटके सर्वाधिक महिलांना सोसावे लागत आहेत. गॅस दरवाढ झाल्याने नक्की कोणाला ‘अच्छे दिन’ येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे अशी टिका प्रेरणा बलकवडे यांनी यावेळी केली. तर आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते पण या महागाईमुळे आता महिलांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशी टिका आंदोलक महिलांनी केली. आंदोलनात सायरा शेख, रुबिना खान, स्वाती मोरे, राधा जाधव, सुलताना शेख,पद्मा गभाले, मनिषा झांजरे, मीना साळवे, रत्ना वाघमारे, लिलाबाई कांबळे आदी उपस्थित होते.