नाशिक : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच श्रेणीसुधार करू इिच्छणार्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या परीक्षा होणार असून 18 नोव्हेंबरपासून प्रात्यिक्षक, तर 20 नोव्हेंबरपासून लेखीपरीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. त्यामुळे दरवर्षी आॅक्टोबर मिहन्यात होणार्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता दहावी-बारावीच्या पुरवणी लेखीपरीक्षा 20 नोव्हेंबर 2020 ला सुरू होणार आहे. यात दहावीच्या प्रात्यिक्षक, श्रेणी, तोंडी परीक्षा 18 नोव्हेंबर 2020 ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत घेतल्या जातील. इयत्ता बारावीच्या प्रात्यिक्षक, श्रेणी, तोंडीपरीक्षा 18 नोव्हेंबर 2020 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.दरम्यान, नियमति, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. श्रेणीसुधार करू इिच्छणार्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर-डिसेंबर 2020 व फेब्रुवारी-मार्च 2021 अशा लगतच्या दोनच संधी मिळणार असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.