नाशिक: महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी सोमवारी शहरातून रॅलीद्वारे एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांनी तर दिंडोरीच्या जागेसाठी भास्कर भगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शालिमार येथील शिवसेना भवनपासून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीसाठी सिन्नर, दिंडोरी, येवला, इगतपुरी, नांदगाव, कळवण, सुरगाणा, पेठ, देवळ्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली शालिमारमार्गे मेनरोड, गाडगे बाबा महाराज चौक, रविवार कारंजा, रेहक्रॉस, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. फलकांनी वेधले लक्षपक्ष कार्यालयापासून निघालेल्या रॅलीमध्ये ढोल ताशांचा गजर करण्यात आला. अन्यायाविरूद्ध लढणार, प्रस्थापितांना भिडणार अन आम्ही जनसेवा करणार, नाशिकच्या शाश्वत विकासाचा चेहरा, जनतेचं प्रेम-माया-विश्वास हीच खरी सावली, मायबाप जनता हीच माऊली यासह वेगवेगळे फलक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हातात होते. ते रॅलीच्या अग्रभागी होते, त्यामुळे ते लक्ष वेधून घेत होते. महिला कार्यकत्यांचे फोटोसेशनरॅलीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांनी रॅलीच्या अगोदर फोटोसेशन केले. उद्धवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भगवी साडी परिधान केली होती. तर पुरूष अन महिलांनी डोक्यावर भगव्याच रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. तप्त उन्हात पायी वारी...सकाळी नऊ वाजेची वेळ दिली असतांना रॅली १२ वाजून ९ मिनिटांनी सुरू झाली. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बरीच वाट पहावी लागली. नाशिकचा पारा ४० अंशांच्यावर गेला असतांना भर उन्हात पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पायी वारी करीत असतांना रॅलीच्या शेवटच्या टप्पयापर्यंत पाेहोचले. शालिमार कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येण्यास सुमारे दाेन तासांचा कालावधी लागला. नेते म्हणाले...१) संजय राऊत (उद्धव सेनेचे नेते तथा खासदार)-महाराष्ट्रातील सर्वात मोठी रॅली बघून आज आनंद होतो आहे. हे आपल्या विजयाचेच चिन्ह आहे. उत्तर महाराष्ट्रातून महायुतीच विजयी होईल. आपल्याला हुकुमशाही नष्ट करायची आहे, हे लक्षात ठेवा.२) जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी)-आजपासून लढाई सुरू झाली आहे. भगरे, वाजे यांनी लढाई सुरू होण्यापूर्वीच जिंकली आहे. शेतकऱ्यांच्याप्रश्नी केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. कांदाप्रश्नी शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पूसली आहेत.३) बाळासाहेब थोरात (काँग्रेस विधिमंडळ नेते)-येथे जमलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्साह चांगला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महाविकास आघाडीलाच राहतील याचा विश्वास आहे.
एकजूट दाखवत रॅलीद्वारे महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन
By suyog.joshi | Published: April 29, 2024 5:36 PM