लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी सण-उत्सव लक्षात घेता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वडाळागावातील श्री. श्री. रविशंकर मार्गावरील झोपडपट्टी भागातील मांगीरबाबा चौकात दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.मांगीरबाबा चौकात मंगळवारी (दि. १८) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रस्त्यावर अचानकपणे मोठ्या स्वरूपात पोलीस फौजफाटा उतरला. पोलिसांच्या वाहनांचा सायरनचा आवाज आणि एकापाठोपाठ दाखल झालेली वाहने त्यामुळे परिसरात नेमके काय अनुचित घडले या औत्सुक्यापोटी नागरिक घराबाहेर आले. यावेळी पोलिसांनी वाहन रस्त्याच्या मध्यभागी उभे करत रस्ता बंद केला. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी सहाय्यक उपायुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक सतीश जगदाळेंसह कर्मचारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वडाळागावात दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:26 IST
इंदिरानगर : पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी सण-उत्सव लक्षात घेता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वडाळागावातील श्री. श्री. रविशंकर मार्गावरील झोपडपट्टी भागातील मांगीरबाबा चौकात दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
वडाळागावात दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक
ठळक मुद्देरस्त्यावर अचानकपणे मोठ्या स्वरूपात पोलीस फौजफाटा उतरला.