देवळा : जम्मू-काश्मीरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरात राज्यातील सुरत, राजस्थानातील बाडमेर येथील घटनांच्या निषेधार्थ पाचकंदील येथे निदर्शने करण्यात येऊन नायब तहसीलदार अनिल चव्हाण व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना अमिना नईम शेख या बालिकेच्या हस्ते निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष ज्योत्स्ना संजय अहेर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब अहेर, जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, सुनील अहेर, किशोर अहेर, नीलिमा अहेर, प्रा. कमल अहेर कुवर, ज्येष्ठ नगरसेवक हाजी सगीर शेख, अतुल पवार, दिलीप अहेर, काकाजी अहेर, निखिल अहेर, रजत अहेर, नईम शेख, अक्रम तांबोळी, कलीम शेख, राजू मन्सुरी, हसन तांबोळी, राजेश अहेर, उमेश अहेर यांच्यासह देवळा मुस्लीम पंच कमिटी, देवळा तालुका मुस्लीम समाज, सुभाषरोड मित्रमंडळ, निमगल्ली मित्रमंडळ, रुद्र प्रतिष्ठान, मृत्युंजय प्रतिष्ठान, मोरया प्रतिष्ठान, नानू आहेर मित्रमंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ, संत भीमा भोई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदन सादरजम्मू-काश्मीर, सुरत, उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये लहान निरागस मुलींवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी व देशात असुरक्षतेची भावना निर्माण करणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने कठोर निर्णय घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
कठुआ प्रकरणाच्या निषेधार्थ निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:15 AM